esakal | मुंबईत जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होणे आवश्यक, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates

मुंबईत जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होणे आवश्यक, कारण...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोनाबाधितांचा शोध घेऊन कोविडचा संसर्ग नियंत्रणात आणायचा आहे. त्यासाठी दिवसाला किमान 40 हजार चाचण्या करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. या चाचण्या वाढवण्यासाठी नागरीकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नमूद केले.

मार्च 2020 ते 10 फेब्रुवारी 2021 दरम्यान सर्वाधिक चाचण्या 24 हजार 500 झाल्या होत्या. यानंतर मुंबईला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसू लागल्यावर चाचण्याची संख्या वाढविण्यात आली. एप्रिल महिन्यात चाचण्याचे सरासरी प्रमाण 44 हजाराच्या आसपास होते. काही वेळा 50 हजाराच्या वरही चाचण्या झाल्या होत्या. तर,एका दिवसात 56 हजार चाचण्याही मुंबईत झाल्या आहेत. गेल्या काही दिवसात चाचण्याची संख्या घटत असून 50 हजारावरुन ती 38 हजारा पर्यंत खाली आली आहे. तर,सुट्टीच्या दिवशी 28 हजारा पर्यंत चाचण्या होत आहेत, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली.

हेही वाचा: म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा

कोविडचा संसर्ग रोखायचा झाल्यास चाचण्यांचे प्रमाण वाढवून जास्तीत जास्त बाधीत शोधून त्यांचे विलगीकरण आणि उपचार केल्यास चांगले परीणाम दिसतात. यामुळे मृत्यूदरही नियंत्रणात येतो त्याच बरोबर संसर्गालाही अटकाव होतो. मुंबईत 80 टक्क्यांच्या वर बाधितांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे चाचण्या वाढविणे आवश्‍यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. आयुक्त चहल यांनी दिवसाला 40 हजार चाचण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी नागरीकांची पुढे येऊन चाचण्या करुन घ्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा: 'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता

55 लाख चाचण्या

मुंबईत आता पर्यंत 54 लाख 90 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 6 लाख 52 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यातील काही दिवस पॉझिटीव्हीटीचा दर 25 टक्क्यांवर गेला होता. मात्र,लॉकडाऊन आणि चाचण्याचे प्रमाण वाढवल्याने वेळीस बाधीत व्यक्ती शोधल्या गेल्याने आता काही दिवस पॉझिटीव्हीटीचा दर 10 टक्क्यांच्या खाली आहे. तर,मार्च 2020 पासून आता पर्यंतचा पॉझिटीव्हीटी दर 11.90 टक्के आहे.

loading image