esakal | मुंबईकरांनो, आज लसीकरणासाठी जाताय? आधी ही बातमी वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-Vaccine

मुंबईकरांनो, आज लसीकरणासाठी जाताय? आधी ही बातमी वाचाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असून मुंबईतही रूग्णसंख्या घटतेय

मुंबई: शहराकडे लसींचा मर्यादित साठा शिल्लक असून काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज (गुरुवारी) फक्त 90 लसीकरण केंद्रांवर लसीचा डोस दिला जाईल, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी सांगितले. (Mumbai Vaccination Update Limited Stock of Vaccine so only 90 centers will be operative)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'च्या टीमचं कौतुक

कोणत्या केंद्रांवर होणार लसीकरण-

पालिकेकडे लसीचा साठा संपला आहे. अशा परिस्थितीत कोणत्या केंद्रांवर लसीकरण सुरू असेल याची ठोस माहिती देण्यात आलेली नाही. गुरुवारी ज्या केंद्रांवर शिल्लक लस उपलब्ध असेल तिथेच लसीकरण होईल. तर इतर केंद्रांवर लसीकरण होणार नाही असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर येत्या दोन दिवसात लस मिळण्याचीही शक्यता कमी आहे, असेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Coronavirus: दादरपाठोपाठ धारावीमध्येही एकही नवा रुग्ण नाही!

बुधवारी महानगरपालिकेच्या 283 केंद्रांवर 55,305 लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये 32,221 लोकांना लस देण्यात आली. सरकारच्या 20 केंद्रांमध्ये 3,006 लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण 90,532 लोकांना लस देण्यात आली. अलीकडेच मुंबईला राज्य सरकारकडून 95,000 डोस मिळाले होते, जे आता संपण्याच्या परिस्थितीत आहेत.

हेही वाचा: Modi Cabinet reshuffle: सरपंच ते भावी मंत्री, कसा आहे कपिल पाटलांचा राजकीय प्रवास

केंद्रांकडून मिळालेल्या लसीचा साठा संपल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. आता ज्या केंद्रांवर कमी जास्त साठा शिल्लक आहे तिथेच गुरुवारी लोकांचे लसीकरण केले जाईल, जिथे साठा नाही तिथे लसीकरण होणार नाही. पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम होईल. लसीकरण केंद्रांनुसार लसीची उपलब्धता कुठे आहे हे पाहण्यासाठी मुंबईकरांनी महापालिकेचे ट्विटर तपासावे. तिथे सर्व माहिती उपलब्ध आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण 58 लाख 84 हजार 19 लोकांना लस देण्यात आली आहे.

loading image