esakal | मुंबईत पुन्हा एकदा जमावबंदीचा आदेश लागू
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai corona

मुंबईत पुन्हा एकदा जमावबंदीचा आदेश लागू

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईत (Mumbai) कोरोनाची (corona) स्थिती नियंत्रणात असली, तरी मुंबईत पून्हा एकदा जमावबंदीचे (ban crowd gathering) आदेश लागू करण्यात आले आहेत. 15 जुलै ते 31 जुलै पर्यंत ही जमावबंदी राहणार आहे. राज्यात सर्वत्र 15 जुलै रोजी सकाळी 7 पासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (In mumbai once again ban on crowd gathering)

यात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे झाल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. सर्व सार्वजनिक ठिकाणं उद्याने आणि समुद्र किनारे या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे. हा आदेश मोडला गेल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंड किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा: किमान 'यांना' तरी लोकल प्रवास करू द्या; शिवसेना आमदाराची मागणी

शहरातील कोरोना आता हळूहळू आटोक्यात यायला लागला असून गेल्या 24 तासात केवळ 635 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,29,250 इतकी झाली. महत्त्वाचे म्हणजे दिवसभराच्या कालावधीत 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,04,259 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

loading image