गणेशमंडपांवरून भाजप युवासेनेमध्ये जुंपली

बाळाच्या जन्माआधीच बारसे नको
भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर
भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर

मुंबई: गणेशोत्सव जवळ येत असताना गणेशमुर्तीकार तसेच मंडळांच्या मंडपांवरून (ganesh mandap) भाजप आणि शिवसेनेची युवासेना यांच्यात वाद पेटला आहे. या मंडपांचे शुल्क माफ करण्याची युवासेनेची (yuva sena) मागणी आहे, तर प्रथम या मंडपांना पालिकेने (bmc) परवानगी तर द्यावी, मग पुढच्या मागण्या करा, बाळाच्या जन्माआधीच बारसे करू नका, असे भाजपने सुनावले आहे. (In mumbai Over ganesh mandap bjp & yuva sena clashes)

गणेशमुर्तीकारांच्या तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना अजून महापालिकेने परवानगी दिली नाही. त्या परवानगीसाठी सायनच्या भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे अर्ज केला आहे. तर या मंडपांचे परवानाशुल्क, भाडे व इतर शुल्क माफ करावे, अशी मागणी युवासेना नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर
'आता भाजपाच्या रडारवर मिलिंद नार्वेकर'

मात्र युवासेनेने आधी मंडपांना परवानगी मिळावी यासाठी धडपड करावी. परवानगी मिळण्याआधीच शुल्कमाफीची मागणी हे म्हणजे बाळाच्या जन्माआधीच बारसे करण्यासारखे आहे, अशा शब्दांत भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी युवासेनेची खिल्ली उडवली आहे.

भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर
१० बार मालकांनी अनिल देशमुखांना चार कोटी रुपये दिले - ED

महापालिका नेहमीच या मंडपांना वेळेत परवानगी देत नाही. मंडप उभारून काम सुरु करा, परवानगीचे नंतर पाहू, असे तोंडी सांगितले जाते. त्यामुळे मुर्तीकारांच्या डोक्यावर टांगती तलवार असते, असा आरोप शिरवडकर यांनी केला. मंडपांना परवानगी मिळण्याआधीच शुल्कमाफीची मागणी करण्यामागे युवासेनेचे सवंग राजकारण आहे. महापालिका तुमचीच आहे, सरकार तुमचेच आहे, त्यामुळे प्रथम या मंडपांना परवानगी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असेही त्यांनी सुनावले आहे.

एकीकडे मंडपांना परवानी मिळत नाही, पण मुंबईतील कित्येक उपहारगृहे व हॉटेल पावसाळ्यापूर्वी महिन्याभराची परवानगी घेऊन बाहेर शेड टाकतात. पावसाळा संपून महिना होऊन गेला तरीही ती शेड काढली जात नाही. दुसरीकडे मंडपांना नोटिसा बजावल्या जातात, हा अन्याय आहे, असेही शिरवडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com