esakal | लोकल प्रवासावर निर्बंध असूनही घडतायत चोरीच्या घटना

बोलून बातमी शोधा

mumbai local
लोकल प्रवासावर निर्बंध असूनही घडतायत चोरीच्या घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: कोरोनाचा संसर्ग वाढू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'ब्रेक द चेन' नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्य सरकारने लोकल प्रवासावर कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, मागील तीन दिवसात लोकल सेवेवर निर्बंध असताना मौल्यवान वस्तू, दागिने, मोबाइल चोरीच्या घटना होत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी लोकल प्रवास करू शकत आहेत. ओळखपत्र दाखवून प्रवाशांना स्थानकावर प्रवेश दिला जातोय. यासाठी स्थानकावर कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकांवर रांगा लावून ओळखपत्र बघूनच रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. परिणामी, स्थानकात प्रवेश करताना सामायिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडतो. यातून चोरीच्या घटना घडण्याची भीती व्यक्त होते.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

मात्र तीन दिवसांत मुंबईतील रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरात एकूण चोरीच्या 27 घटना घडल्या आहे. ज्यात मोबाईल चोरी, बॅग चोरी, पाकीट चोरी, पर्स चोरी, जबरीने मंगळसूत्र चोरी, सारख्या घटना घडल्या आहे. या 27 चोरीच्या घटनांपैकी 20 घटना या मोबाईल चोरीची आहेत. यापैंकी ३ चोरीच्या घटनेची उकल लावण्यात आली असून तीन्ही घटना या मोबाइल चोरीच्या आहेत.

हेही वाचा: विदारक सत्य! जिवंतपणी बेड्स मिळेना अन् मृत्यूनंतर...

23 एप्रिल रोजी 11 गुन्ह्यांपैकी 9 गुन्हे मोबाइल चोरीचे, 24 एप्रिल रोजी 7 गुन्ह्यांपैकी 5 गुन्हे मोबाइल चोरीचे, 25 एप्रिल रोजी 9 गुन्ह्यांपैकी 6 गुन्हे मोबाइल चोरीचे झाल्याची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी लॉकडाउनमुळे लोकल सेवा बंद होती. यावेळी मोबाइल चोरीच्या घटना बंद झाल्या होत्या. मात्र, 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा चोरीच्या घटनेचा आलेख वाढत गेला.