esakal | विदारक सत्य! जिवंतपणी बेड्स मिळेना अन् मृत्यूनंतर...

बोलून बातमी शोधा

कल्याण स्मशानभूमी
विदारक सत्य! जिवंतपणी बेड्स मिळेना अन् मृत्यूनंतर...
sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असताना त्या रुग्णांना बेड, इजेक्शन, प्लाझ्मा वेळेवर न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. आता मृत्यू नंतर ही स्मशान भुमीत मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन-तीन तास थांबून रहावे लागत आहे. त्यामुळे आता तरी पालिका माणुसकी दाखवणार का? असा सवाल केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील जाणिव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय विठोबा भापकर यांच्या 60 वर्षीय मातोश्री यांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवार 24 एप्रिल रोजी  खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन  अभावी रात्री साडेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयमधील प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर कल्याण पूर्व मधील  विठ्ठल वाडी स्मशान भूमी मध्ये रात्री 2 वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

मात्र तेथील कर्मचारी कार्यालयास टाळे मारून निघून गेले होते. संजय भापकर समवेत त्याच्या नातेवाईकांनी तेथे बोर्डवर लिहलेल्या नंबर वर संपर्क साधला मात्र कोणीही फोन उचलत नव्हते. पहाटे  चारच्या सुमारास गॅस दाहिनीच्या ऑपरटेरने फोन उचलला. त्यांनी सांगितले की, सकाळ पासून सात मृतदेहांचे दहन केल्याने मशिन खूप गरम आहे. आता मृतदेह मशिममध्ये ठेवला तर, मशीन खराब होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: "काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

तुम्ही लाकडावर दहन करा. अन्यथा सात वाजेपर्यंत मी येतोय तोवर थांबा असा सल्ला संजय भापकर आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. अखेर ते साडेपाचच्या सुमारास स्मशान भूमीत आले. व्यक्तीच्या मृत्यूचे दु:ख आणि अंत्यसंस्काराला लागणारा विलंब या सर्वाचा कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

एकीकडे 24 तास स्मशान भूमी सुरू ठेवणार असल्याची घोषणा कागदावर असून आता तरी पालिका आयुक्त आणि त्यांचे अधिकारी जागे होणार का? असा सवाल संजय भापकर यांनी केला आहे. याबाबत पालिका सचिव आणि मालमत्ता विभाग प्रमुख संजय जाधव यांनी सांगितले की, स्मशान भूमीचे काम बघणाऱ्या ठेकेदाराला 24 तास स्मशान भूमी सुरू ठेवण्याचे सक्त आदेश दिल्याचे स्पष्ट केले.