Mumbai Crime: ब्युटिशिअनसोबत धक्कादायक प्रकार, Loan App ने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो

Loan App: हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ब्युटिशिअन एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Loan App Share Nude And Morphed Photos Of Beautician In Mumbai
Loan App Share Nude And Morphed Photos Of Beautician In MumbaiEsakal

मुंबईतील एका ब्युटिशिअनसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका Loan App ने तिचे नग्न आणि मॉर्फ केलेले फोटो तिच्या ओळखीच्या लोकांना शेअर केले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ब्युटिशिअन एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या ब्युटिशिअनने संबंधित लोन अ‍ॅपवरुन 1 एप्रिल रोजी 10 हजार रुपये कर्ज घेतले होते. ते वसूल करण्यासाठी या लोन अ‍ॅपने ब्युटिशिअनचे आक्षेपार्ह आणि छेडछाड केलेले फोट तिच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना पाठवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या ब्युटिशअनला 1 एप्रिल रोजी Everloan या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपबाबत माहिती मिळाली. जे 7 दिवसांसाठी कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देते. त्यानंतर या ब्युटिशअनने आपले फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अ‍ॅपला पुरवली आणि 10 हजारांचे कर्ज घेतले.

हे कर्ज फेडण्याच्या शेवटच्या दिवशी ब्युटिशअनला कर्ज देणाऱ्या अ‍ॅपकडून फोन आला. त्यावेळी तिकडून बोलणारा व्यक्ती म्हणाला कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे फक्त 30 सेकंद शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर काही क्षणातच ब्युटिशअन आणि तिच्या ओळखीच्या 2 लोकांच्या मोबाईलवर तिचे आक्षेपार्ह फोटो आले. त्यानंतर या महिलेच्या मोबाईवर एक टेक्स्ट मेसेज आला ज्यामध्ये लिहिले होते की, लवकरच तुझे मॉर्फ केलेले व्हिडिओ तुझ्या ओळखीच्या लोकांशी शेअर केले जातील.

Loan App Share Nude And Morphed Photos Of Beautician In Mumbai
Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या अडचणी वाढणार? प्रचारसभेत काँग्रेसबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल

पुढील बदनामीच्या भीतीने पीडितेने घाईघाईने कर्जाचे पैसे भरले आणि तातडीने पोलिसांची मदत मागितली. यानंतर पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांवर आयपीसी अंतर्गत खंडणी फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

Loan App Share Nude And Morphed Photos Of Beautician In Mumbai
Anjali Damania: "आखिर कहना क्या चाहते हो?" दमानियांचा राज ठाकरेंना सवाल

यापूर्वी 2022 मध्येही अशीच एक घटना मुंबई घडली होती. एका महिलेने त्यावेळी एका लोन अ‍ॅपवरुन अवघ्या 3 हजरांचे कर्ज घेतले होते. मात्र, या महिलेला ते वेळेत फेडता आले नव्हते. त्यानंतर ऑनलाइन ॲप चालवणाऱ्या कंपनीने महिलेचे मॉर्फ केलेले नग्न फोटो बनवले आणि ते तिच्या सर्व फोन कॉन्टक्ट्सना पाठवले होते. ती छायाचित्रे महिलेचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतर परिचितांपर्यंत पोहोचली. त्यानंतर महिलेने पोलिसांमध्ये धाव घेत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com