esakal | दुर्मिळ अळिंबी बाजारात : आदिवासींना रोजगाराची चांगली संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दुर्मिळ अळिंबी बाजारात : आदिवासींना रोजगाराची चांगली संधी

sakal_logo
By
संदिप पंडित

विरार : पावसाळा सुरु झाला कि डोंगराळ भागात अनेक भाज्या (Vegetables) मिळू लागतात तश्याच भाज्या सद्या वसई (Vasai) तालुक्याच्या डोंगराळ भागात आणि जंगल पट्टीत उगवणाऱ्या रान भाज्या सद्ध्या बाजारात (Market) मोठ्या प्रमाणात दिसत आहेत .या मध्ये वर्षभरातून याच मोसमात लाल देठ, टाकळा ,बांधावरील कवळा ,अशा भाज्यांबरोबर (Vegetables) रानावनात खूप भटकून मिळणारी दुर्मिळ असलेली व थोड्या प्रमाणात मिळणारी खास व अत्यंत चविष्ट भाजी (Vegetables) म्हणजे गावरान अळिंबी (Alambi) हि सुद्धा बाजारात विक्रीसाठी येत आहे .यातून येथील आदिवासींना एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

अळिंबी शरीराला अत्यंत पोषक वर्षातील औषधी भाजी म्हणून अळिंबी भाजी कडे पाहिले जात असून या भाजीचा खास असा खवय्या वर्ग आहे . मात्र जंगलात मिळणाऱ्या व सारख्याच दिसणाऱ्या अळिंबी मधून खाण्या योग्य कुठली अळिंबी आहे हे भाजी आणणारे जाणकारच ओळखू शकतात . नाहीतर रान अळिंबी मध्ये विषारी अळिंबी हि असतात (कुत्र्याची छत्री) औषधी गुण असलेल्या या भाजीचे वैशिष्ठ्य असे आहे कि, जंगलात फक्त याच मोसमात उगवणारी हि भाजी महाग असूनही जास्त मागणी असणारी भाजी आहे .

हेही वाचा: रेशीम कोषास विक्रमी 51 हजार भाव; शेतकरी आणि खरेदीदारांचा सत्कार

शेतकरी व मजूर आदिवासी माळरानात उगवणाऱ्या व रानातून गोळा केलेल्या या भाज्या स्वत: वसईतील मोक्याच्या नाक्यावर विकताना दिसत आहेत .यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी मिळत आहे

loading image
go to top