esakal | वीज खांब जाहिरातीच्या विळख्यात.
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वीज खांब जाहिरातीच्या विळख्यात.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : नगररस्ता येथील पूर्व भागात विजेच्या खांबावर ,झाडांवर , सिग्नलच्या खांबावर सर्रासपणे जाहिरातीचे फलक दिसून येतात.जाहिरातीने येथील परिसर विद्रूप झाला असून , लटकत्या जाहिराती मुळे किरकोळ अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशा फुकट्या जाहिरातदारांना आवर घालावा असे सांगण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

विमाननगर चंदननगर,कल्याणीनगर, वडगावशेरी या भागामध्ये ठिक ठिकाणी विजेच्या खांबावर अनधिकृत जाहिरात फलक लावून व्यवसायाची प्रसिद्ध केली जात आहे.कोचिंग क्लासेस, हॉटेल ,खासगी शाळा, पीजी, बंगले, फ्लॅट,अशा अनेक जाहिराती खांबावर झळकत आहे. लटकलेले फलक धोकादायक ठरू शकतात. सोसाट्याच्या वाऱ्याने खांबा वरील जाहिरातीचा बोर्ड कोणत्याही क्षणी अंगावर पडून अपघात घडू शकतो.अंतर्गत रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे विजेच्या खांबावरील जाहिराती फलक लवकरात लवकर काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: भिवंडीत सात जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश;पाहा व्हिडिओ

स्वप्निल पाडाळे : स्थानिक नागरिक

जाहिरातीतून पालिकेलां जे महसूल मिळत असतो तो बुडतो. फुकट्या जाहिरातदारांचे फलकावर नाव नंबर असुन ही पालिकेचे अधिकारी जाणुन बुजून का दुर्लक्ष करीत आहे. स्वच्छ पुणे ठेवण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

प्राजक्ता पाटील - स्थानिक रहिवासी

विजेच्या खांबावर लावलेल्या अनेक जाहिराती अधांतरी असल्याने एखाद्या

पादचाऱ्यांच्या डोक्यावर पडून गंभीर दुखापत होऊ शकते अनर्थ घडण्याआधी प्रशासनाने कारवाई करावी.

सुहास जगताप : सहाय्यक आयुक्त नगररोड क्षेत्रीय कार्यालय

अनधिकृतपणे जाहिराती फलक लावणार्‍यावर कारवाई सुरू आहे. चंदननगर पोलिस स्टेशन येथे काहीजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top