
ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पेनतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे. येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात १ लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.