esakal | नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिस ठाण्याचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिस ठाण्याचे उद्घाटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जयंतीचे निमित्त साधत पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या उपस्थितीत एएसआय विष्णू फडके (Vishnu Phadke) आणि महिला पोलिस (Police) हवालदार इंद्रा ठाकरे यांच्या हस्ते नव्या आचोळे पोलिस (Police) ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा: मुंबई : उपनगराच्या मीरा-भाईंदर-वसई पोलीस आयुक्तालयाची करडी नजर

या वेळी अप्पर पोलिस आयुक्त, वसई परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त प्रशांत वागुंडे, परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संजय पाटील, क्राईम पोलिस उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त अमोल मांडावे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नव्या आचोळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून चंद्रकांत सरोदे पदभार सांभाळणार आहेत; तर त्यांच्या नेतृत्वाखाली १ पोलिस निरीक्षक, एपीआय, पीएसआय दर्जाचे ११ पोलिस अधिकारी, ७० पोलिस कर्मचारी कार्यरत असणार आहेत. नालासोपारा पूर्व एव्हरशाईन लास्ट स्टॉपजवळील पाण्याच्या टाकीजवळ हे पोलिस ठाणे सुरू झाले आहे.

loading image
go to top