महाड क्रांतीदिनासारखे ऐतिहासिक क्षण साजरे केले पाहिजेत - प्रा. आनंद देवडेकर

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतातील शोषित वंचितांच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्य लढ्याची संघर्षमय सुरुवात महाडच्या चवदार तळ्यावर होऊन त्याची यशस्वी सांगता नागपूरला ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेने झाली, याचं भान ठेवून आपण महाड क्रांतीदिनासारखे ऐतिहासिक क्षण साजरे केले पाहिजेत असे प्रतिपादन पहिल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी महाड (गोरेगाव) येथे बोलताना केले.

महाड जवळील गोरेगाव येथील संबोधी बुद्ध विहाराच्या भव्य वास्तूत आयोजित महाड क्रांतीदिनाच्या एक्याणवव्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रा. आनंद देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष आयु. विकासदादा गायकवाड हे होते. प्रा. देवडेकर पुढे म्हणाले, सर्वांगीन पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या बौद्ध समाजाने आता संभ्रम निर्माण करणाऱ्या बहुजन वा साम्यवादी संकल्पनाच्या नादी लागून प्रतिक्रांतीच्या सापळ्यात न अडकता आपला प्रवास धम्माकडून सद्धम्माकडे करायला हवा. 

या कार्यक्रमात कवी विवेक मोरे, सुमेध जाधव, विश्वतेज साळवी अॅड. विलास लोखंडे इत्यादींची प्रसंगोचित भाषणे झाली. या प्रसंगी पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग या संस्थेच्या जुन्या विश्वस्तांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर नव्या विश्वस्तांचे नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

रामदास महाडिक, दीपक माने, राजेंद्र पवार, स्मिता लोखंडे, मुंबई संघाचे कार्यकर्ते व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 841 चे पदाधिकारी या कार्यक्रमात  बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. अशोक साळवी यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत स्वागताध्यक्ष आयु. चंद्रमणी साळवी यांनी केले.

Web Title: incidence like mahad revolution have to celebrate - anand devadekar