धक्कादायक ! ठाणे झेडपीच्या शिक्षण विभागात 'कोरोना'चा शिरकाव, वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

ठाणे जिल्हा परिषदेच्या साथ रोग नियंत्रण कक्षात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या साथ रोग नियंत्रण कक्षात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यात आता, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात देखील कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक विभागातील एका महिला क्लार्कला कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, पोलीस प्रशासन आदी विभागात कोरोनाने शिरकाव केला आहे. या आजारावर यशस्वी मात करून अनेक जण पुन्हा सेवेत दाखल झाले आहे. असे असतानाच आरोग्य इमारतीतील साथ रोग नियंत्रण विभाग कार्यरत कर्मचाऱ्याला मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता  ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कोरोनाने शिरकाव केला आहे.

नक्की वाचा तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

प्राथमिक विभागात काम करणाऱ्या महिला क्लार्कला कोरोनाची लागण झाल्याची बाब सोमवारी (ता.23) सायंकाळी समोर आली. त्यामुळे या विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस हा विभाग बंद ठेवण्यात आहे.

the inclusion of Corona in the education department of Thane ZP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the inclusion of Corona in the education department of Thane ZP