परप्रांतीय फेरीवाल्याचा समावेश देशव्यापी प्रकल्पात; स्विकारला ई रूपीचा पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hawkers

Mumbai : परप्रांतीय फेरीवाल्याचा समावेश देशव्यापी प्रकल्पात; स्विकारला ई रूपीचा पर्याय

मुंबई - बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून येऊन गेली २५ वर्षे फळविक्रेता फेरीवाला म्हणून बच्चे लाल सहानी काम करतात. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाच्या समोरील फुटपाथवरच त्यांचा व्यवसाय चालतो. आरबीआयच्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या (ई रूपी) देशव्यापी पथदर्शी प्रकल्पात सहानी यांची निवड झाली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांनी डिजिटल व्यवहार स्विकारण्यासाठी सुरूवात केली आहे.

गेल्या महिन्यापासून त्यांनी ई रूपीच्या स्वरूपात व्यवहार स्विकारण्यासाठी सुरूवात केली आहे. या ई रूपीच्या पर्यायाच्या माध्यमातून आतापर्यंत काही व्यवहार झाले आहेत. ई रूपी प्रकल्पाच्या निमित्ताने आरबीआयच्या अधिकार्‍यांनी ई रूपीच्या व्यवहारासाठी सहानी यांचे मन वळवले. या प्रकल्पाच्या निमित्ताने सहानी यांचे आयडीएफसी फर्स्ट बॕंकेचे खातेही सुरू करण्यात आले. या डिजिटल पर्यायामुळे बँकेशी संबंधित प्रत्येक व्यवहाराचा मॕसेज त्यांना येतो.

आरबीआयने प्रत्यक्ष चलनी नोटांना पर्याय देणारा ई रूपीच पर्याय देणारा पथदर्शी प्रकल्प देशभरात सुरू केला. त्यामध्ये १५ हजार ग्राहकांची आणि विक्रेत्यांची निवड करण्यात आली आहे. सहानी हेदेखील या निवडक लोकांचा सहभाग असलेल्या पथदर्शी प्रकल्पाचा भाग आहेत. आरबीआयने नोव्हेंबर २०२२ मध्ये या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांची निवड केली आहे.

सध्या सहानी यांच्याकडे डिजिटल व्यवहारांची संख्या कमी आहे, पण या ई रूपीच्या निमित्ताने ग्राहकांना आणखी एक पर्याय मिळाल्याचे सहानी सांगतात.

काय आहे ई रूपीचा प्रकल्प?

बँकेच्या चलनातील नोटांच्या तुलनेत हा डिजिटल टोकनचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पर्याय आहे. त्यामुळे चलनी नोटांसारखाच पर्याय या पर्यायातूनही मिळतो. मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात एसबीआय, आयसीआयसीआय, येस आणि आयडीएफसी फर्स्ट या बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :MumbaiProjecthawkeraccept