Yogendra Puranik : जपानी शाळांच्या पाठ्यपुस्तकात भारतीय मूळ वंशाच्या योगेंद्र पुराणिक उर्फ योगी यांचा समावेश

योगेंद्र पुराणिक यांचा जन्म मुंबई जवळील अंबरनाथ येथे झाला. इथूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी पुणे, जपान, फ्रांस, चीन मध्ये घेतले.
Yogendra Puranik
Yogendra Puraniksakal

मुंबई - जपानी हायस्कूलच्या सामाजिक अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात भारतीय मूळाचे आणि जपान मध्ये स्थायिक झालेले विशेष म्हणजे भारतीय वंशाचे एकमेव स्थानिक आमदार (खुगिकाईगीइन) योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. यात भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातीलही माहिती आहे. मात्र एका मराठी भाषिक आणि तेथील स्थानिक आमदार असलेल्या पुराणिक यांची नोंद येथील पाठ्यपुस्तकात झाल्याने त्यांचे स्थानिक मराठी जपान मंडळांकडून स्वागत केले जात आहे.

जपानी हायस्कूल म्हणजे इयत्ता 10वी ते 12वी च्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात भारतीय मूळाचे आणि जपान मध्ये स्थायिक झालेले योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी जी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल (IISJ) सोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल.

योगेंद्र पुराणिक यांचा जन्म मुंबई जवळील अंबरनाथ येथे झाला. इथूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी पुणे, जपान, फ्रांस, चीन मध्ये घेतले. पुराणिक हे जापानमध्ये स्थायिक असून त्यांनी टोकियो येथील येदोगावा या मतदारसंघातील आमदार (खुगिकाईगीइन)म्हणून 2019 मध्ये निवडून आले आहेत. भारतीय वंशाचे ते एकमेव आमदार आहेत. तसेच आता ते जपान मधील शिक्षण विभागात पहिले-वहिले भारतीय मूळाचे सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते जपान मधील एका सरकारी शाळेचे पहिले-वहिले परकीय मूळाचे प्राध्यापक ही आहेत.

एका मराठी माणसाच्या कार्याची ओळख जापानी शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात होतेय, याचा मला सार्थ आनंद आणि अभिमानही वाटला. मला अधिकाऱ्यांनी कळवल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. ही अनपेक्षित ओळख, येथील समुदायाच्या अतुलनीय समर्थन आणि आदराचा परिणाम आहे असे मला वाटते. हे पाठ्यपुस्तक, एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखले जाणार असून, एप्रिल 2024 पासून सर्व जपानी उच्च माध्यमिक शाळांमधील अभ्यासक्रमाचा भाग असेल.

- योगेंद्र पुराणिक (योगी), भारतीय वंशाचे एकमेव आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com