Income Tax Crime : अबू आझमी यांच्याविरुद्ध आयकर विभागाची कारवाई

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे.
MLA abu azmi
MLA abu azmiesakal

मुंबई - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. अबू आझमी यांचे वाराणसीतील नव्याने बांधलेले एक इमारत संकुल, फ्लॅट आणि सुमारे 50 कोटी रुपयांच्या बँक ठेवी बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत.

आयकर विभागाच्या लखनऊ पथकाने बेनामी मालमत्तेचा तपास करण्यासाठी वाराणसी आणि महाराष्ट्रात काही भागात छापेमारी केली होती. झडतीदरम्यान बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यांतर्गत, आयकर विभागाने जंगम आणि स्थावर मालमत्तेसाठी तात्पुरते संलग्नक आदेश जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अबू आझमी हे मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने विनायक ग्रुप नामक कंपनीच्या 10 कोटी रुपयांच्या बँक ठेवीदेखील जप्त केल्या आहेत. वाराणसीतील मालदहिया येथे विनायक प्लाझा नावाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर देखील आयकर विभागाने कारवाई केली आहे.

लखनऊ शहरातील हमरौतिया परिसरात हमरौतिया प्रकल्पातील काही फ्लॅट कथितपणे अबू आझमी यांच्या मालकीचे असून त्यांची किंमत अंदाजे 30-32 कोटी रुपये आहे. आयकर विभागाने 5 ऑक्टोबर रोजी देशभर 9 ठिकाणी या प्रकरणात कथित संबंध असलेल्या काही आरोपीच्या ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी येत्या काळात आयकर विभागाकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com