मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींची गैरसोय; अफगाणच्या चार विद्यार्थिनी अडकल्या

मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींची गैरसोय; अफगाणच्या चार विद्यार्थिनी अडकल्या
मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींची गैरसोय; अफगाणच्या चार विद्यार्थिनी अडकल्या

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील मादाम कामा वसतीगृहात अफगाणिस्तान येथील चार विद्यार्थिनी लॉकडाउनमुळे अडकून पडल्या आहेत. या विद्यार्थिनींची जेवणाची गैरसोय होत आहे. याकडे अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी लक्ष वेधले. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर रविवारी युवासेनेने या विद्यार्थिनींना धान्य पुरवठा केला. 

विद्यापीठाच्या वसतिगृहात लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. मादाम कामा वसतिगृहात जास्त विद्यार्थिनी होत्या; मात्र काही विद्यार्थिनी परवानगी घेऊन आपल्या मूळ गावी गेल्यानंतर तेथे सध्या चारच विद्यार्थिनी सध्या आहेत. या विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय होत आहे. याबाबत युवा सेनेच्या अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी विद्यापीठाकडे 14 मे रोजी तक्रार केली; मात्र याकडे लक्ष न दिल्याने अखेर शीतल यांच्या सूचनेनुसार कुलाबा विधानसभा विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ व युवासैनिक पवन धोत्रे, यश काते, स्वप्निल महाडिक यांच्या मार्फत एक महिन्याचे अन्नधान्य, भाज्या व फळ या विद्यार्थिनींना पुरवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे.

छात्र भारतीचीही मदत
विद्यापीठाच्या कलिना वसतीगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई छात्रभारतीने मदतीचा हात दिला आहे. संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्क,सॅनिटायझर, हॅन्डवॉश सोबत अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तुंचे वाटप करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमांतून शेकडो लोकांना अन्नवाटप केले जात आहे; मात्र विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणाऱ्या मुठभर विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासन अजुन घेत नसल्याचे छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com