
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री गारवा तर दिवसा ऊन असे विचित्र वातावरण आहे. या हवामान बदलामुळे मुंबईत तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. यातील काही रुग्ण निव्वळ तापाचे असल्याचे तपासणीतून समोर येत आहे. हा आकडा येत्या काळात वाढत जाणार असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सामान्य ताप औषधोपचाराने बरा होऊ शकतो; मात्र कोरोनामुळे प्राथमिक अंदाजात ताप गंभीर लक्षण मानले जात आहे. थंडी वाढेल त्याप्रमाणे तापाचे रुग्णही वाढण्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी नायर रुग्णालयात 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 902 तापाचे रुग्ण बाह्यरुग्ण कक्षात उपचारासाठी येऊन गेल्याचे आकडेवारी सांगते. तत्पूर्वी 25 ते 31 ऑक्टोबरदरम्यान 866 जण ओपीडीत ताप आल्याची तक्रार नोंदवत होते. ही आकडेवारी तापाचे रुग्ण वाढत असल्याचे स्पष्ट करते. केईएम रुग्णालयातील तापाची ओपीडीही 100 च्या पलीकडे गेल्याची नोंद आहे. तापाचे रुग्ण आल्यास आम्ही रॅपिड टेस्ट करत असल्याचे सायन रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
अद्याप तापाचे रुग्ण नियंत्रणात आहेत; मात्र येत्या काळात वाढ होऊ नये म्हणून मुंबईकरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना रुग्ण आणि सध्या तापाचा रुग्ण ओळखणे आता कठीण नसून कोरोना रुग्णांचे आरोग्य लवकर खालावते. कोरोना रुग्ण की साधा ताप हे निदान करण्यासाठी अनेक चाचणी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
- डॉ. रमेश भारमल,
प्रमुख रुग्णालय संचालक, पालिका
Increase in fever patients in Mumbai Appeal to take care of health due to cold
-------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.