आगीच्या घटनांमध्ये फटाक्‍यांमुळे वाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दिवाळीत फटाक्‍यांमुळे आग लागण्याच्या घटना वाढल्या असून मागील चार वर्षांत फटाक्‍यांमुळे आगीच्या 175 घटना घडल्या आहेत.

मुंबई : दिवाळीत फटाक्‍यांमुळे आग लागण्याच्या घटना वाढल्या असून मागील चार वर्षांत फटाक्‍यांमुळे आगीच्या 175 घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने आहवालात ही माहिती दिली आहे. या सर्व सौम्य प्रकारच्या आगीच्या घटना असून यात कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

मुंबईत दिवाळीतील फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे अनेकदा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई अग्निशमन दल विभागाने आगीच्या घटनांची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली. या आकडेवारीनुसार 2016 ते 2019 या चार वर्षांच्या काळात दिवाळीच्या फटाक्‍यांमुळे 175 वेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या. 2016 च्या दिवाळीत 53, वर्ष 2017 च्या दिवाळीत 25, वर्ष 2018 च्या दिवाळीत 50 आणि वर्ष 1019 च्या दिवाळीत 47 आगी लागण्याच्या घटना घडल्या. यातील जास्त घटना या सौम्य प्रकारातील आहेत. यात कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. 

चार वर्षांमध्ये 2016 मधील दिवाळीत सर्वाधिक 53 आगीच्या घटना घडल्या; तर 2017 मध्ये केवळ 25 घटना घडल्या. 2018 मध्ये आगीच्या घटनांचा आकडा वाढून तो 50 वर पोचला, तर यावर्षीच्या दिवाळीत मागील वर्षापेक्षा तीनने घट होऊन 47 आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in fire events