लॉकडाऊन काळात केलेल्या सेल्फ मेडिकेशनमुळे नागरिकांच्या पोटदुखीत वाढ

लॉकडाऊन काळात केलेल्या सेल्फ मेडिकेशनमुळे नागरिकांच्या पोटदुखीत वाढ

मुंबई: कोरोनाचे विषाणू उन्हामध्ये मरतात म्हणून रोज उन्हामध्ये 2 तास उभे राहा, जर तुम्ही हळद नियमितपणे घ्याल तर तुम्हाला कधीही कोरोना होणार नाही असे अनेक उपाय लॉकडाऊन कालावधीत  सोशल मीडियावर आपण ऐकले असतील आणि हे उपाय अनेक जणांनी केले असून या सर्व चुकीच्या उपायांचा दुष्परिणाम अनेक नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.

नवी मुंबईतील तेरणा स्पेशॅलिटी रुग्णालय अँड रिसर्च सेंटरच्या एका निरीक्षणानुसार रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे, औषधी काढे तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत घेतलेल्या विविध उपायांमुळे अ‍ॅसिडिटी, पोटातील अल्सर, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध आजारांमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निरिक्षणानुसार ही औषधे कोरोना रोखू शकत नाहीत. मात्र मानवी शरीरावर त्याचे बरेच दुष्परिणाम उद्भवतात आणि याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.

तेरणा स्पेशॅलिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचे लॅपरोस्कोपिक आणि पाइल्स शल्यचिकित्सक डॉ. नितीन तवटे यांनी सांगितले की, “वैद्यकीय देखरेखीशिवाय रुग्णांनी घेतलेली विविध औषधे शरीरावर हानिकारक परिणाम करतात. त्यातून पोटाचे अल्सर, ऍसिडिटी आणि मुळव्याधी संबंधित प्रकरणे वाढली आहेत. अशा परिस्थितीत जे रुग्ण औषधांना प्रतिसाद देत नाही अशा रुग्णांना एन्डोस्कोपीची आवश्यकता असते. 

रुग्णांना होतायत हे आजार

रुग्णांमध्ये पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे, आम्लपित्त होणे, सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे, पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे, भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यातील अनेक जणांनी गरज नसताना कोरोनाच्या भीतीमुळे  विविध प्रकारचे काढे, औषधे घेतल्याचे समोर आले आहे. अन्ननलिका, जठर, पक्वाशय, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत आणि स्वादूपिंड यांतील आजारांमध्ये आपण पचनसंस्थेच्या आजारांचे प्रामुख्याने वर्गीकरण करतो. अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते.  भारतात आजघडीस साधारणतः 6 कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे 10 लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात.


काही काळापूर्वी मूळव्याध हा साधारण

चाळीशीनंतर उद्धभवणारा आजार होता. पण आता 18 ते 25 या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागली आहे. कोरोना संक्रमण काळामध्ये अनेक नागरिकांनी पोटाच्या आजारांवर घरगुती उपाय करत राहिल्यामुळे अनेकांना शल्यचिकित्सेची गरज निर्माण झाली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय म्हणजेच मेडिकल दुकानातून जीवनसत्त्वे वाढवण्यासाठी घेतलेल्या गोळ्या अथवा सिरप, भूक लागण्याची औषधे, हर्बल तसेच आयुर्वेदिक औषधोपचार घेताना आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे, असा सल्ला ही डॉ. नितीन तवटे यांनी दिला आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increased abdominal pain citizens due to self-medication done during lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com