हिरड्यांतील रक्तस्त्रावाच्या समस्येत वाढ! दात घासणे, खाण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम; तज्ज्ञांचे मत

भाग्यश्री भुवड
Sunday, 18 October 2020

दात दुखीची समस्या असणाऱ्या जवळपास 70 टक्के रुग्णांमध्ये हिरड्यांच्या रक्तस्त्रावाची समस्या जाणवत आहे. दात घासण्याच्या व खाण्याच्या चुकीच्या सवयींचा हा परिणाम असून, या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई : दात दुखीची समस्या असणाऱ्या जवळपास 70 टक्के रुग्णांमध्ये हिरड्यांच्या रक्तस्त्रावाची समस्या जाणवत आहे. दात घासण्याच्या व खाण्याच्या चुकीच्या सवयींचा हा परिणाम असून, या रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

'कोरोना काळात जन्माला आलेल्या नवजात बाळांची काळजी घेणे महत्वाचे'

दातांच्या समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांपैकी जवळजवळ 70 टक्के रुग्णांना हिरड्यांतून रक्त येत असल्याची समस्या दिसून येते. ही समस्या दात घासण्याच्या चूकीच्या सवयीमुळे होते. त्याचप्रमाणे 30 ते 40 वयोगटातील महिलांना गरोदरपणामुळे तसेच संप्रेरकांची पातळी जास्त असल्यास हिरड्यांभोवती असलेल्या जीवाणूंच्या अस्तित्वामुळे त्या अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्या हिरड्यातून सहज रक्तस्राव होऊ शकतो. मधुमेह असलेल्या लोकांना मौखिक आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर अनियंत्रित असल्यास, त्याला तोंडी आरोग्य समस्या विकसित होण्याची अधिक शक्‍यता असते. असे अपोलो क्‍लिनिकच्या दंतचिकित्सक डॉ. प्राची हेंद्रे यांनी सांगितले. यासाठी दात घासण्याचे योग्य तंत्र जाणून घ्या, दर सहा महिन्यानंतर दंतचिकित्सकास भेट द्या. हिरड्यांची समस्या कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि ताजे फळे खा. हिरड्यांची तसेच दातांची काळजी हे मूल जन्मल्यानंतर सहा महिन्यांपासूनच सुरू व्हायला हवी आणि उर्वरित आयुष्यभर दातांची निगा ही राखलीच गेली पाहिजे. असेही हेंद्रे यांनी सांगितले. 

कोविडमुक्त 22 वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपण, भारतातील पहिली शस्त्रक्रिया

रक्तस्त्राव होण्याची कारणे 

  • स्त्रियांमध्ये होणारे संप्रेरकातील बदल 
  • खाण्याच्या चूकीच्या सवयी 
  • रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी 

निरोगी हिरड्यांसाठी आहारात किवी, सफरचंद, नासपती, बेरी, संत्री, क्रॅनबेरी आणि गाजर, पालक, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दर सहा महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्या. याशिवाय दात घासण्याच्या योग्य तंत्रासह खाण्याच्या चांगल्या सवयी असणे खूप गरजेचे आहे. 
- डॉ. प्राची हेंद्रे, दंतचिकित्सक, अपोलो क्‍लिनिक. 

-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased gum bleeding problem! Brushing teeth, the result of wrong eating habits; Expert opinion