स्क्रीनटाईम वाढल्याने तरुणांना पक्षाघाताचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्क्रीनटाईम वाढल्याने तरुणांना पक्षाघाताचा धोका

स्क्रीनटाईम वाढल्याने तरुणांना पक्षाघाताचा धोका

मुंबई : कोरोनामुळे बहुतांश नागरिकांना विशेषतः तरुणांना कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी दीर्घकाळापर्यंत स्क्रीन्ससमोर बसून राहावे लागत आहे; मात्र तरुण पिढीचा स्क्रीनटाईम वाढल्याने पक्षाघाताचा धोका वाढत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे लवकर झोपूनही लवकर उठणे अवघड होत असल्याचे न्यूरोसर्जन डॉ. उज्ज्वल येवले यांनी सांगितले.

‘अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन’च्या २०२१ संशोधनातून स्क्रीनवर अधिक वेळ घालवणाऱ्या, तसेच बैठे काम करणाऱ्या ६० वर्षांखालील प्रौढ व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत पक्षाघाताचा धोका अधिक आहे.

हेही वाचा: धोका पक्षाघाताचा! जीवनशैलीत करा बदल अन् धोका करा कमी

‘वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन’च्या माहितीनुसार चारपैकी एका व्यक्तीला एकदातरी पक्षाघाताचा धक्का बसतो. ‘दि लॅन्सेण्ट ग्लोबल हेल्थ’ संशोधनातून भारतातील असंसर्गजन्य न्यूरोलॉजिकल आजारांचे प्रमाण १९९० मधील ४.० टक्क्यावरून २०१९ मध्ये ८.२ टक्क्यांपर्यंत दुप्पट झाले असल्याचे सांगण्यात आले. भारतातील १.८ दशलक्ष व्यक्तींना दरवर्षी पक्षाघात येतो. त्याशिवाय स्क्रीनटाईम वाढल्याने व्यक्तीला विविध हृदयविषयक आजार, कर्करोग आदींचाही धोका निर्माण होत असल्याचे संशोधानातून समोर आल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले.

पक्षाघात टाळण्यासाठी काय करावे?

  • दररोज एक तास चालावे.

  • दररोज ३० मिनिटे व्यायाम करा.

  • स्क्रीनटाईम कमी करण्याचा प्रयत्न करा.

  • लॅपटॉपसमोर बसून काम करावे लागत असेल, तर ठराविक वेळाने विश्रांती घ्या.

हेही वाचा: म्यूकरमायकोसिसनंतर बेल पक्षाघाताचा वाढता धोका; दुसऱ्या लाटेत रुग्णांची भर

"लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल आदींवर सतत दोन तास घालवल्याने पक्षाघाताचा धोका २० टक्क्यांनी वाढतो. पक्षाघाताचा आजार उपचाराने बरा होणारा असला तरी तो होऊ नये म्हणून चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत."

- डॉ. उज्ज्वल येवले, न्यूरोसर्जन

loading image
go to top