esakal | अनलॉक मुंबई ठरतेय जास्त धोकेदायक! इमारतीच्या इमारती कोरोना पॉझिटीव्ह; धक्कादायक माहिती आली समोर
sakal

बोलून बातमी शोधा

अनलॉक मुंबई ठरतेय जास्त धोकेदायक! इमारतीच्या इमारती कोरोना पॉझिटीव्ह; धक्कादायक माहिती आली समोर
 • घरातूनच कोरोनाचा वाढता संसर्ग
 • 16 सोसायट्यांमध्ये 40 पेक्षा जास्त रुग्ण 
 • प्रवासामुळे कुटुंबातील इतर सदस्यनांही लागण

अनलॉक मुंबई ठरतेय जास्त धोकेदायक! इमारतीच्या इमारती कोरोना पॉझिटीव्ह; धक्कादायक माहिती आली समोर

sakal_logo
By
समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा


मुंबई : मुंबई अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यापासून इमारतींमध्ये कोव्हिड रुग्ण वाढत आहेत. शहरातील 16 सोसायट्यांमध्ये 40 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. गोरेगावमधील एका सोसायटीमध्ये तर, 110 रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे इमारतीच्या एकाच घरात, मजल्यावर अथवा विंगमध्ये जास्त रुग्ण आढळत आहेत.  

Big News - राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत शरद पवारांच्या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

अनलॉक कालावधीत नोकरदार लहानमोठे व्यवसायिक प्रवास करत आहेत. या प्रवासात कोव्हिडची बाधा होऊन घरातील सदस्यांना संसर्ग होत असल्याची शक्यता वैद्यकिय कर्मचारी व्यक्त करत आहेत. महापालिका मुख्यालयातही असाच प्रकार पाहण्यास मिळत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांना कोव्हिडची बाधा झाल्यानंतर त्यांच्यापासूूून कुटूंबातील सदस्यांना संसर्ग झाल्याचे प्रकार आढळल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

नवी मुंबईकरांनो सावधान, कोरोनासह 'हे' आजारही वाढवतायत नवी मुंबईकरांची चिंता...

मुंबईत 24 जूलै रोजी 21 हजार 374 रुग्ण इमारतीतमध्ये आढळले आहेत. 19 जुलैरोजी  20 हजार 735 रुग्ण आढळले होते. आश्चर्य म्हणजे रुग्णांची संख्या वाढलेली असताना सिल इमारतींंची संख्या 6 हजार 235 वरुन 6 हजार 169 वर आल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.  गोरेगाव येथील रहेजा सॉलिटरी या इमारतीत 110 रुग्ण आढळले असल्याची नोंद आहे. कांजूरमार्ग येथील एमएमआरडीए कॉम्पेक्समध्ये 85 रुग्ण आढळले आहेत.  त्याखालोखाल ताडदेव येथील आओ साई एसआरएमध्ये 83 रुग्ण आढळले आहेत. 

कोव्हिडग्रस्त इमारती 
लालबाग येथील लालबागचा राजा गृहनिर्माण सोसायटीत 70 रुग्ण आढळले आहेत. माहिम फिशरमन कॉलनी आणि कोळीवाड्यात 73 तर, मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत 60 रुग्णांची नोंद आहे. परेल येथील खापरी देवी सोसायटीत 46, अमेय सोसायटी लालबाग येथे 47, दाभोळकर वाडी एसआरएमध्ये 47, तर भोईवाडा येथील श्री बालाजी सोसायटीत 46 रुग्ण नोंदविण्यात आले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गावात सुरू होता धक्कादायक प्रकार; टेम्पो पकडल्याने झाला उलगडा...

दोन इमारतीत 114 रुग्ण 
गोवंडी येथील लल्लूभाई कंपाऊड मधील दोन इमारतींमध्ये 114 रुग्ण आढळले आहे. इमारत क्रमांक 13 ए मध्ये 61 आणि 12 नंबरमध्ये 53 रुग्ण आढळले आहेत. मानखुर्द महाराष्ट्रनगरमधील सिध्दिविनायक सोसायटीत 79 रुग्णांची नोंद झाली आहे. अंधेरी येथील लोटस छाया सोसायटीत 36 आणि अमन हिल मध्ये 66 रुग्णांची नोंद झाली आहे.

24 जूलैरोजी इमारतींमधील स्थिती

 • - रुग्ण - 21 हजार 374
 • - सील इमारती - 6 हजार 169
 • - घरे - 2 लाख 55 हजार 109
 • - रहिवासी --8,92,287

पतपेढ्यांचे अर्थकारण डळमळीत! कर्जवसूली 5 ते 10 टक्क्यांवर; नवे कर्जदार मिळणेही कठिण

19 जूलैरोजी स्थिती

 • रुग्ण - 20 हजार 735
 • सील इमारती- 6हजार 235
 • घरे - 2 लाख 62 हजार 570
 • नागरिक - 9 लाख 33 हजार 334
   

------------------------------------------------------------ 

Edited by Tushar Sonawane

loading image
go to top