मोबाईल तिकिटांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मध्य रेल्वेवर 28 हजार 691 आणि पश्‍चिम रेल्वेवर 18 हजार 75 तिकिटे मोबाईलवरून काढण्यात आली. 

मुंबई  - रेल्वे प्रवाशांनी मोबाईल तिकिटांना भरघोस प्रतिसाद दिला आहे. मध्य रेल्वेवर 28 हजार 691 आणि पश्‍चिम रेल्वेवर 18 हजार 75 तिकिटे मोबाईलवरून काढण्यात आली. 

स्थानकांतील तिकीट खिडक्‍यांसमोरची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधा आणली. पहिल्यांदा चेन्नईत उपनगरी मार्गावर ही योजना यशस्वी झाली. त्यानंतर जून 2015 मध्ये मुंबईत पश्‍चिम रेल्वे आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मध्य रेल्वेवर ही सुविधा सुरू झाली. मोबाईल तिकिटासाठी यूटीएस ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागते. 

सुरुवातीला मोबाईल तिकिटाला प्रवाशांनी पसंती दिली नव्हती; परंतु काही तांत्रिक बदल करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी मोबाईलवरून तिकिटे काढण्यास पसंती दिली. सध्या पश्‍चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर मोबाईल तिकिटांचा वापर अधिक होतो. मध्य रेल्वेवर 2017-18 मध्ये दिवसाला 7000 मोबाईल तिकिटे काढली होती. हे प्रमाण 2018-19 मध्ये 28 हजारांवर गेले आहे. 

प्रवाशांची पसंती 
महिना मध्य रेल्वे पश्‍चिम रेल्वे 
एप्रिल 2018 3,65,729 2,55,225 
मे 2018 4,20,534 2,91,464 
जून 2018 4,79,906 3,29,755 
जुलै 2018 5,43,447 3,52,592 
ऑगस्ट 2018 8,09,073 4,68,750 
सप्टेंबर 2018 9,10,022 5,43,725 
ऑक्‍टोबर 2018 8,95,527 5,24,880 
नोव्हेंबर 2018 10,00,913 6,02,208 
डिसेंबर 2018 11,39,018 7,13,530 
जानेवारी 2019 12,91,851 8,26,557 
फेब्रुवारी 2019 12,36,655 7,99,878 
मार्च 2019 13,79,677 8,88,629 
एकूण 1,04,72,352 65,97,193 

Web Title: Increasing response of passengers to mobile tickets