

Dombivli World Record Tiranga Rally
ESakal
डोंबिवली : स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत शनिवारी देशप्रेम आणि सामाजिक एकतेचा उत्साहपूर्ण प्रत्यय आला. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डोंबिवलीतील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत सुमारे ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो नागरिकांनी हातात घेऊन मार्गक्रमण केले. सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया , आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या माध्यमातून अधिकृत नोंद प्रक्रिया करण्यात आली.