Andheri Election : अंधेरीच्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट? 'या' उमेदवाराचा उद्धव ठाकरेंच्या सेनेवर गंभीर आरोप

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Summary

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Andheri East By-Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं (BJP) माघार घेतलीय. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील, असं त्यांनी सांगितलं. मात्र, आता अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट पहायला मिळतोय.

आता एका अपक्ष उमेदवारानं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेवर (Shiv Sena) गंभीर आरोप केलेत. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता, असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षावर केला आहे. तसंच याबाबत मिलिंद कांबळेंनी निवडणूक आयोगाला (Election Commission) एक पत्र लिहून तक्रारही दाखल केलीय.

Uddhav Thackeray
Forbes 2022 List : गौतम अदानी बनले भारतातील सर्वात 'श्रीमंत' व्यक्ती; मुकेश अंबानींना टाकलं मागं!

ऋतुजा लटकेंच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते, असा खळबळजनक दावा कांबळे यांनी केला आहे. या पोटनिवडणुकीतील मतदानाला काही दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवारानं ऋतुजा लटके यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत तक्रार केल्यानं आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Uddhav Thackeray
Jayant Patil : शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप; NCP च्या प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला मतदान

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या 3 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी दिली. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com