Navi Mumbai: नवी मुंबईत स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी, कुठे आणि का? जाणून घ्या...
Navi Mumbai Airport:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पार पडले आहे. अशातच नवी मुंबई विमानतळ परिसरातील सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन होणार असल्याची महिती समोर आली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन होणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी मंजुरी दिली असून विविध संवर्गातील १०८ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.