esakal | ...भारतात 'यासाठी' व्हिडिओ पाहणाऱ्यांचे प्रमाण जास्त!
sakal

बोलून बातमी शोधा

...भारतात 'यासाठी' व्हिडिओ पाहणाऱ्यांचे प्रमाण जास्त!

भारतीय नेटकरी हल्ली काही ना काहीतरी शिकण्यासाठी ऑनलाईन व्हिडियो पाहत आहेत, टाळेबंदीच्या काळात तर हे प्रमाण वाढले आहे. बहुसंख्य लोक व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्रजीपेक्षा हिंदीला किंवा आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

...भारतात 'यासाठी' व्हिडिओ पाहणाऱ्यांचे प्रमाण जास्त!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय नेटकरी हल्ली काही ना काहीतरी शिकण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहेत, टाळेबंदीच्या काळात तर हे प्रमाण वाढले आहे. बहुसंख्य लोक व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्रजीपेक्षा हिंदीला किंवा आपल्या मातृभाषेला प्राधान्य देतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

ही बातमी वाचली का? कोरोना संसर्ग केवळ स्पर्शामुळेच होतो का ? उच्च न्यायालयाने केला महत्वपूर्ण सवाल...

गुगलने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणात भारतीय व्हिडिओ वापरकर्त्यांचा तपशील ठाऊक झाला आहे. 15 ते 34 या वयोगटातील 73 टक्के नेटकरी काहीतरी शिकण्यासाठी गुगलवर व्हिडिओ पाहतात. सहा ते दहा मिनिटांचे ऑनलाईन व्हिडिओ सर्वात जास्त (90 टक्के) पाहिले जातात. व्हिडिओ पाहण्याचा रोजचा सरासरी वेळ 67 मिनिटे असतो व हिंदी भाषेतील व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जातात, असेही इंडियन ऑनलाईन व्हिडियो व्ह्यूवर या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ही बातमी वाचली का? 'निसर्ग' आलं आणि सगळं उध्वस्त करून गेला, लॉकडाऊनमधले संसार आता थेट उघड्यावर...


दरमहा चोवीस कोटी 50 लाख वापरकर्ते व्हिडिओ पाहतात. यूट्यूब हे भारताच्या 85 टक्के नेटकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. 55 टक्के वापरकर्ते आपल्या मनावरील ताण घालविण्यासाठी व्हिडियो पाहतात, तर त्याखालोखाल बहुसंख्य लोक अभ्यासासाठी व्हिडियो पाहतात. 11 टक्के लोक आपल्या मित्रांशी, नातलगांशी जोडलेले राहण्यासाठी ऑनलाईन असतात. तर एक तृतियांश लोक व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन राहतात, असेही या सर्वेक्षणात दिसून आल्याचे बिस्बो इंडिया चे शाकीर एब्राहिम यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? मुंबईत रुग्णांचा आकडा पोहोचला ४४ हजारांवर; जाणून घ्या आजची आकडेवारी..

करमणुकीपेक्षा बातम्यांना पसंती
नेटकरी व्हिडिओतून काय पाहतात, याचा शोध घेतल्यावर काहीतरी शिकण्यासाठी किंवा बातम्या, जगातील घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहिले जातात, असे कळले. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान कोरोनाची भीती असताना तर नेटकऱ्यांनी करमणुकीपेक्षा बातम्या तसेच विश्लेषणाचे व्हिडियो पाहण्यास पसंती दिली. बहुसंख्य लोक इंग्रजीपेक्षा हिंदी किंवा आपल्या मातृभाषेचा आधार घेतात असेही आढळून आले. 54 टक्के लोकांनी हिंदीतून तर 16 टक्के लोकांनी इंग्रजीतून व्हिडियो पाहिले.

loading image
go to top