

sanjay raut on ajit pawar
esakal
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनी राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवली आहे. त्यांनी अजित पवारांना 'अर्धे पाकिस्तानी' संबोधत गंभीर आरोप केले, तसेच भारत-पाक सामन्याला परवानगी देणे हे भाजपचे 'राष्ट्रभक्तीचे ढोंग' असल्याचा दावा केला.