esakal | महाराष्ट्राच्या मदतीला AIR FORCE, ऑक्सिजनचं एअरलिफ्ट नाही पण...
sakal

बोलून बातमी शोधा

air force-oxygen

महाराष्ट्राच्या मदतीला AIR FORCE, ऑक्सिजनचं एअरलिफ्ट नाही पण...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा सामना करताना, काय समस्या, अडचणी आहेत, त्याची पंतप्रधानांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांसोबत काय संवाद झाला? त्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुपारी माहिती दिली. पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेमध्ये ऑक्सिजन संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनचा साठा लवकरात लवकर मिळावा, यासाठी इंडियन एअर फोर्स मदत करणार आहे.

महाराष्ट्राला अन्य राज्यांकडून ऑक्सिजन मिळत असला, तरी तो ऑक्सिजन पोहोचायला विलंब लागत असल्याच्या मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन घेऊन ट्रेन निघालीय, पण या ट्रेनला पोहोचायला उशिर होतोय.

हेही वाचा: स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

महाराष्ट्रात ऑक्सिजन एअर लिफ्टींगने पोहोचवता येईल का? अशी विचारणा केली. त्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राजेश टोपेंनी सांगितले.

हेही वाचा: लर्निंग लायसन्स आणि नव्या वाहन नोंदणीबाबत निराशाजनक बातमी

आपल्या ऑक्सिजन आणण्यासाठी ज्या राज्यातून कोटा मिळालाय, तिथे एअर फोर्सच्या मालवाहतूक विमानांमधून रिकामे टँकर्स पाठवले जातील. त्या टँकर्समध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वे मार्गाने किंवा जवळचे ठिकाणं असेल, तर रस्ते मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्रात येईल असे टोपे यांनी सांगितले. आपल्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाखांच्या घरात आहे. त्यात गंभीर केसेस १० टक्के होतात. त्यामुळे ऑक्सिजन न्याय पद्धतीने मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ऑक्सिजन पुरवठ्या संदर्भात ऑक्सिजन निर्मात्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे राजेश टोपे म्हणाले.

loading image