सायन किल्ला फक्त मॉर्निंग वॉकसाठी ? सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचा सवाल | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sion Fort

सायन किल्ला फक्त मॉर्निंग वॉकसाठी ? सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवडी : मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणारा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ( Indian Archaeological Survey) विभागाच्या मुंबई सर्कलचे मुख्य कार्यालय असलेला सायन किल्ला (Sion Fort) कोरोनाचे नियम (corona rules) शिथिल झाल्यानंतरही पूर्ण वेळ नव्हे तर सकाळी ६ ते ११ या वेळेतच उघडण्यात येत असल्याने किल्ला फक्त मॉर्निंग वॉकसाठीच (Morning walk) आहे का, असा सवाल सह्याद्री प्रतिष्ठान (sahyadri pratishthan) या संस्थेमार्फत उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

मुंबईमधील किल्ले हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांनी पाहावेत या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुंबईमधील सायन किल्ला हा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्याअंतर्गत असून किल्ल्यातच मुंबई सर्कल (पुरातत्त्व विभाग) यांचे कार्यालय आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर मुंबई जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पूर्ण वेळ खुली करण्यात आली आहेत.

परंतु सायन किल्ला हा सोमवार ते शनिवार सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत तर रविवारी ६ ते ९ वाजेपर्यंत या वेळेतच उघडतो. या किल्ल्यात बृहन्मुंबई महापालिका उत्तर विभागाच्या अंतर्गत येतो. सध्याची वेळ फक्त मॉर्निग वॉकसाठी असून किल्ल्याचा उपयोग त्याचसाठी आहे का, असा सवाल सह्याद्री प्रतिष्ठानसह पर्यटक विचारत आहेत.

पर्यटकांचा हिरमोड

पूर्वी येथील उद्यानात लहान मुले सायंकाळी खेळण्यासाठी यायची, मात्र किल्ल्यासाठी निवडण्यात आलेली मॉर्निंग वॉकच्या वेळेमुळे बच्चेकंपनीला या उद्यानात खेळता येत नाही; तर मुंबईतील नागरिकांना व मुंबईबाहेरील पर्यटकांना किल्ला पाहता येत नाही. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ६ यादरम्यान किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे.

किल्ला पूर्ण वेळ खुला करा!

पुरातत्त्व विभागाने किल्ला पूर्ण वेळ खुला करावा, अशी मागणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अधीक्षकांकडे सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत करण्यात आली आहे, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य गणेश रघुवीर यांनी सांगितले.

"कोरोनाचे नियम शिथिल झाल्यापासून सायन किल्ला दररोज पर्यटकांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यादरम्यान खुला असतो. मात्र किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा जर हिरमोड होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत रितसर चौकशी करून योग्य निर्णय घेऊन किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल."
- रवींद्र यादव, अधीक्षक

loading image
go to top