
डोंबिवली : भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना मारले. या वृत्तानंतर डोंबिवली येथील दिवंगत संजय लेले यांचे सुपुत्र हर्षल यांनी बाबांना आज खरी श्रद्धांजली मिळाली. कालच बाबांचा वाढदिवस झाला असे म्हणताना हर्षल भावूक झाला. काल वाढदिवस झाला आणि आज या हल्ल्यातील दहशतवादी मारला गेला आहे समजलं, त्यामुळे त्याचा आनंद देखील आहे असे तो अभिमानाने म्हणाला.