भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई! मध्य समुद्रात आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

Oil Smuggling Racket Busted: भारतीय तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैलांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Oil Smuggling Racket Busted

Oil Smuggling Racket Busted

ESakal

Updated on

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत अरबी समुद्रात धाडसी कारवाई केली. संघर्षग्रस्त देशांतून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात तेल व तेलजन्य माल समुद्री मार्गाने आणला जात होता. त्यानंतर हा माल आंतरराष्ट्रीय पाण्यात, मध्य समुद्रातच मोटर टँकर्सना गुप्तपणे ट्रान्सफर केला जात होता. या बेकायदा व्यवहारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा कमावण्याचा रॅकेटचा डाव होता. तटरक्षक दलाच्या अचूक गुप्त माहिती, तांत्रिक देखरेख आणि समुद्री कारवाईमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस येत तस्करीची साखळी उध्वस्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com