Mumbai : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचे प्राण वाचविण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy helicopter accident save lives of three army mumbai

Mumbai : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचे प्राण वाचविण्यात यश

मुंबई : भारतीय नौदलाचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टरला बुधवारी मुंबई किनार्‍यावर नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरल कशामुळे अपघात झाले हे समजू शकलेले नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

बुधवारी 8 मार्चला सकाळी ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरु केला. नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या घटनेच्या आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.