Indigenously Built Warship
sakal
मुंबई - भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात रविवारी आणखी मोठी भर पडणार आहे. देशातच विकसित आणि बांधण्यात आलेल्या ‘दूनागिरी’, ‘संशोधक’ आणि ‘अग्रय’ या तीन अत्याधुनिक युद्धनौकांचा २१ जून रोजी कोलकाता येथे भारतीय नौदलात औपचारिक समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.