मुंबई : वेला पाणबुडी नौदलात दाखल | Indian navy update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vela submarine

मुंबई : वेला पाणबुडी नौदलात दाखल

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : प्रोजेक्ट 75 प्रकल्पातील वेलाही (Vela submarine) स्कॉर्पिओ जातीची चौथी पाणबुडी आज नौदल (Indian navy) ताफ्यात दाखल करून घेण्यात आली. नौदलप्रमुख अॅडमिरल कर्मबीर सिंह (Admiral karambir singh) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. ही पाणबुडी नौदलाच्या पश्चिम विभागीय ताफ्यातच राहणार आहे.

हेही वाचा: डोंबिवली : बाळाची परस्पर खरेदी विक्री प्रकरणी डॉक्टर सह आई वडिलांवर गुन्हा दाखल

ही पाणबुडीदेखील तिच्या विशिष्ठ रचनेमुळे तसेच तिच्या आवरणामुळे शत्रूच्या सोनार वा अन्य शोधक यंत्रणेला चकविण्यात यशस्वी ठरते. तिच्यावर शत्रूच्या पाणबुड्यांचा नाश करण्यासाठी लांब पल्ल्याचे पाणतीर (टॉरपेडो) व जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आहेत.

प्रोजेक्ट 75 मध्ये सहा पाणबुड्या बांधल्या जात असून वेला ही त्यातील चौथी पाणबुडी आहे. शत्रूच्या जहाजांना व पाणबुड्यांना शोधण्यासाठी त्यावर अत्याधुनिक सोनार यंत्रणा व सेन्सर्स असतात. तसेच या पाणबुडीवर प्राणवायू निर्मितीसाठी वेगळी यंत्रणा असल्याने या पाणबुड्या नेहमीच्या परंपरागत पाणबुड्यांपेक्षा जास्तवेळ पाण्याखाली राहू शकतात.

loading image
go to top