

Gen Z Post Office
ESakal
मुंबई : भारतीय टपाल विभाग मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई येथे सुरू करणार असून, त्याचे उद्घाटन गुरुवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.