
नितीन बिनेकर
मुंबई : रेल्वेने दिलेली आपत्कालीन सुविधा आता गैरवापराचं हत्यार बनली आहे. केवळ १९ दिवसांत मध्य रेल्वे मार्गावर ६६६ अलार्म चेन पुलिंगच्या घटनांमुळे १५० मेल व एक्सप्रेस गाड्यांना लेटमार्क बसला आहे. परिणामी हजारो प्रवासी अडचणीत सापडले. मागील वर्षी याच कालावधीत ९८ गाड्या लेटमार्क बसला होत्या. यंदा चेन पुलिंगच्या घटनांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ झाली असून रेल्वे प्रशासनानं थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.