IND vs AUS: मायदेशी परतलेल्या टीम इंडियाला स्पेशल सूट

पूजा विचारे
Thursday, 21 January 2021

मुंबईत परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. क्रिकेटर्संना  विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक कामगिरी करुन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. मुंबईत परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. क्रिकेटर्संना  विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष आणि एमसीए सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्ती नंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला  क्वारंटाईनमधूनन सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केल्याची माहिती समजतेय. त्यानंतर मुंबई महापालिकेला ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून आलेल्या टीम इंडियाला मुंबई विमानतळावर क्वारंटाईन न करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा- कंगनाच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स जारी 

विजय मिळवून आज मुंबईत विमानतळावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंसाठी क्वारंटाईनचे नियम शिथिल करण्यात आलेत. त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना थेट घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीम इंडियाची पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडू यांना कुटुंब समवेत काही वेळ घालवायचा होता. नियमानुसार क्वारंटाईन हे करावे लागले असते. मात्र  शरद पवार यांच्या मध्यस्तीनंतर खेळाडू यांना क्वारंटाईन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Indian team returned home Test series  Australia Ajinkya Rahane Prithvi Shaw no quarantine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team returned home Test series Australia Ajinkya Rahane Prithvi Shaw no quarantine