नायजेरियात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याची ओढ, अपुऱ्या सुविधांमुळे हाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

जगभरात कोरोनाचे संकट वाढत असताना परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. नायजेरीया या देशामध्ये महाराष्ट्रातील 500 हून अधिक कुटुंब राहत असून तेही तेथे अडकून पडली आहेत.

ठाणे : जगभरात कोरोनाचे संकट वाढत असताना परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. नायजेरीया या देशामध्ये महाराष्ट्रातील 500 हून अधिक कुटुंब राहत असून तेही तेथे अडकून पडली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान तेथील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे धास्तावलेल्या महाराष्ट्र मंडळ रहिवासी असोसिएशन ऑफ नायजेरीया यांनी भारतीय दुतावास आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना ई-मेलद्वारे मदतीची विनंती केली आहे.

नक्की वाचा  : लॉकडाऊन : गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र मंडळ नायजेरियाचे अध्यक्ष गिरीश जयकर यांनी 29 एप्रिल रोजी हा ईमेल पाठवला असून तेथील परिस्थिती कथन केली आहे. सध्या तेथे 500 हून अधिक महाराष्ट्रीयन कुटुंबे नोकरी- व्यवसायानिमित अडकली आहेत. यातील एका महाराष्ट्रीयन व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला. सध्या नायजेरिया मध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी मर्यादित उपचार प्रणाली असून व्हेंटिलेटर्सची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना तेथून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. त्यामुळे तेथील भारतीयांना देखील मायदेशी परतायचे आहे. त्यामुळे या भागात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी या मंडळाकडून करण्यात आली आहे.

नक्की वाचा कोरोना योद्धांना भारतीय हवाई दलाकडून अनोखी मानवंदना

नायजेरियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी पत्र लिहून या त्यांची व्यथा मांडली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती देत त्यांना लवकरात लवकर पावले उचलण्याची विनंती केली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,  परराष्ट्र व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव डी.रवी आणि नायजेरियतील राजदूत अभय ठाकुर यांनाही तातडीने पत्र पाठवून पाठपुरावा सुरु केला आहे.                                               - संजय केळकर, आमदार,  ठाणे

 

Indians stranded in Nigeria are reluctant to return home due to inadequate facilities


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians stranded in Nigeria are reluctant to return home due to inadequate facilities