

Mahalaxmi Race Course Central Park
ESakal
मुंबई : दक्षिण मुंबईच्या हरित आणि शाश्वत विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने प्रियदर्शिनी पार्क येथे आयोजित ‘सिटीझन डायलॉग’ कार्यक्रमाला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वरळी ते कुलाबा परिसरातील ३५० हून अधिक नागरिक आणि विविध रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली. यात महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘सेंट्रल पार्क’चे सादरीकरण करण्यात आले.