भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आकाराला येतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Long Tunnel

जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे अशी ओळख असलेल्या भारतीय रेल्वेने सध्या जम्मू आणि काश्मीर सारख्या दुर्गम राज्याला उर्वरित देशासोबत जोडण्याच्या कामाला प्राधान्यक्रम दिला आहे.

India Long Tunnel : भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आकाराला येतोय

मुंबई - जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे अशी ओळख असलेल्या भारतीय रेल्वेने सध्या जम्मू आणि काश्मीर सारख्या दुर्गम राज्याला उर्वरित देशासोबत जोडण्याच्या कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. सध्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प मिशन मोडवर आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा आकाराला येतोय. T49 असे या बोगद्याचे नाव असून, याची लांबी 12.75 किलोमीटर आहे. भारतीय रेल्वे मार्गावरचा हा सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील संबर आणि अर्पिंचला स्टेशन्सना हा बोगदा जोडतो. पायाभूत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अफकॉन्सने या बोगद्याची उभारणी करत आहे. आतापर्यंत या बोगद्याचे 60 टक्के काम झाले आहे.या प्रकल्पाअंतर्गत दोन अडिट, वीस क्रॉस पॅसेजेस, दोन पूल आणि स्टेशन यार्डचे बांधकाम सुरु आहे.

उत्खननातील आव्हाने

बोगद्याची उभारणी करताना गुरुत्वाकर्षणाच्या आव्हानासोबत इतर अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यात वेंटिलेशन सिस्टीम, पाण्याचा निचरा करणे तसेच प्रतिकूल भूवैज्ञानिक आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये काम करणे ही होती. उत्खनना दरम्यान खडक फुटणे, तुंबणे आणि फुटणे अशा घटना होत होत्या. त्यासाठी प्रेशर रिलीफ होल पाडून , त्याला तत्काळ आधार देण्यासाठी स्वेलेक्स बोल्ट बसवले गेल्याची माहिती अफकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रशेखर दीक्षित यांनी दिली.

बोगद्याची वैशिष्टे

- T49 हा देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

- बोगद्याची एकुण लांबी - 12.75 किमी

- यापुर्वी पीर-पंजाल बोगद्याची लांबी 11.2 किलोमीटर होती

- आतापर्यंत 60 टक्के काम म्हणजे 7.32 किमी बोगल्याचे काम पुर्ण