जयसिंग, ग्रोव्हर यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

परदेशी निधी नियमन कायद्याचा (एफसीआरए) भंग केल्याचा आरोप असलेले ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. हे दोघे आणि त्यांच्या संस्थेविरोधात तूर्तास कठोर कारवाई करू नये, असा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.

मुंबई - परदेशी निधी नियमन कायद्याचा (एफसीआरए) भंग केल्याचा आरोप असलेले ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. हे दोघे आणि त्यांच्या संस्थेविरोधात तूर्तास कठोर कारवाई करू नये, असा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन आठवड्यांपासून इंदिरा जयसिंग व ग्रोव्हर यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. या संस्थेला सामाजिक कार्यासाठी दिलेला परवाना केंद्र सरकारने २०१६ मध्ये रद्द केला आहे. इंदिरा जयसिंग अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असताना लॉयर्स कलेक्‍टिव्ह या संस्थेकडून वेतन घेत होत्या. हा निधी परदेशातून येत होता; मात्र सरकारला माहिती दिली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indira Jaysing and Anand Grover Court