बेशिस्त कर्मचाऱ्यांना चाप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नवी मुंबई - बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. कामावर उशिरा येणारे लेटलतीफ, ओळखपत्र न घालणे व जेवणाच्या वेळेत टाईमपास करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिकेची शिस्त बिघडल्याची बातमी "सकाळ'ने दिली होती. तिची दखल घेत प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी प्रशासनातील बेशिस्त अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई केली होती. लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा पगार कापला होता. महापालिकेचा कर्मचारी कोण व सर्वसामान्य नागरिक कोण हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांना गळ्यात ओळखपत्र घालणे बंधनकारक केले होते. काही विभागातील ठराविक कर्मचारी जेवणाच्या सुटीत तासन्‌ तास कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होते. मुंढेंच्या कारवाईमुळे त्यांच्यावरही जरब बसली होती; परंतु त्यांच्या बदलीनंतर अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मुंढेंनी बसवलेली शिस्तीची घडी विस्कटली. कर्मचारी पुन्हा कामावर उशिरा येण्यास सुरुवात झाली होती. ओळखपत्र गळ्यात न घालणे, जेवणाच्या सुटीत वेळ घालवणे असे प्रकार वाढल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. महापालिकेत सुरू झालेल्या या बेशिस्तीमुळे कारभारात ढिलाई आली होती. यावर पुन्हा एकदा अंकुश यावा यासाठी प्रशासनाने बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे. 

कामावर येण्याची वेळ न पाळणे, ओळखपत्र न घालणे, कामाच्या वेळेत टाईमपास करताना आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. तसे परिपत्रकही काढले आहे. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. 
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त 

Web Title: Indiscipline employees