Indo-French Relationship: भारतातील युवकांना आता फ्रांसमध्ये मिळणार रोजगाराच्या विविध संधी

टीमने मुंबईतील विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद आंतराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधीनीस भेट दिली | The team visited Swami Vivekananda International Skill Development Prabodhini at Vidyavihar, Mumbai
Indo-French Relationship: भारतातील युवकांना आता फ्रांसमध्ये मिळणार रोजगाराच्या विविध संधी

Mumbai News: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत फ्रान्सचे काऊन्सुलेट जनरल जीन मार्क सेरे चार्लेट आणि त्यांच्या टीमने मुंबईतील विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद आंतराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधीनीस भेट दिली. (india french realationship)

Indo-French Relationship: भारतातील युवकांना आता फ्रांसमध्ये मिळणार रोजगाराच्या विविध संधी
Indo Count Industries Ltd : केवळ 11 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश, कोणता आहे हा शेअर ?

भारतातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भेट अतिशय महत्वाची होती. या भेटीत काऊन्सुलेट जनरल चार्लेट यांनी मंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या आंतराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीबाबत अधिक जाणून घेतले. दोन्ही देशांना या संकल्पनेचा कसा लाभ होईल यावर चर्चा देखील केली.(maharashtra news)

या प्रबोधिनीमार्फत कुशल मनुष्यबळाच्या शोधात असलेले फ्रान्समधील उद्योग व्यवसाय, परदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेले भारतीय यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.(intarnational marathi news)

Indo-French Relationship: भारतातील युवकांना आता फ्रांसमध्ये मिळणार रोजगाराच्या विविध संधी
Indo-Canada:हरदीप निज्जर गुरुद्वाऱ्यांमधील पैसा कॅनडाच्या पंतप्रधानाच्या पक्षाला देत होता, काँग्रेस खासदाराचा गौप्यस्फोट

आजच्या घडीला जवळपास ८०० फ्रेंच कंपन्या भारतात कार्यरत आहेत. त्या कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळाचा विचार करून भारतातील तरुणांना संधी मिळेल आणि सोबतच फ्रान्समध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये देखील नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

या प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना देखील फ्रान्स किंवा इतर देशात कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.(international relationship)

Indo-French Relationship: भारतातील युवकांना आता फ्रांसमध्ये मिळणार रोजगाराच्या विविध संधी
Indo-China Border:अरुणाचल प्रदेशमध्ये भारताने बांधला सर्वात लांब बोगदा, काही मिनिटात सैनिक पोहोचणार चीनच्या सीमेवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com