इंद्राणी मुखर्जी म्हणते मला तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचारांची गरज

इंद्राणी मुखर्जी म्हणते मला तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचारांची गरज


 मुंबई : शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही; त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचारांची गरज असल्याचे तिच्या वतीने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात सांगण्यात आले. 

इंद्राणी मुखर्जी हिने सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणासाठी जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर शुक्रवारी न्या. जे. सी. जगदाळे यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने तिच्या प्रकृतीची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, मागील नोव्हेंबरपासून अशी तपासणी झाली नसल्याचे तिच्या वतीने सांगण्यात आले.

खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तिच्या वतीने ॲड्‌. तन्वीर अहमद यांनी केली. या अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे. या खटल्यात आतापर्यंत ३२ साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली; मात्र आरोपी पीटर मुखर्जी याचा मुलगा राहुल याची जबानी झालेली नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी (ता. १९) होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com