उद्योगनगरी नवी मुंबईची गती मंदच; कामगारांच्या कमतरतेचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

  • नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातील टीटीसी इंडस्ट्रीयलमध्ये उद्योगधंदे सुरू झाले असले तरी त्याची गती अद्याप मंदच आहे. परगावी गेलेल्या कामगारांमुळे निर्माण झालेली पोकळी उद्योगांना अद्याप भरून काढता आली नाही.
  • इतरही अनेक प्रश्‍न नव्याने निर्माण झाले आहेत. सद्यस्थिती फारशी अनुकूल नसल्याने उद्योगनगरीतील गाडा सुरळीत होण्यास बराच कालावधी जाणार आहे, असे उद्योजकांचे मत आहे.

वाशी : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातील टीटीसी इंडस्ट्रीयलमध्ये उद्योगधंदे सुरू झाले असले तरी त्याची गती अद्याप मंदच आहे. परगावी गेलेल्या कामगारांमुळे निर्माण झालेली पोकळी उद्योगांना अद्याप भरून काढता आली नाही. इतरही अनेक प्रश्‍न नव्याने निर्माण झाले आहेत. सद्यस्थिती फारशी अनुकूल नसल्याने उद्योगनगरीतील गाडा सुरळीत होण्यास बराच कालावधी जाणार आहे, असे उद्योजकांचे मत आहे. 

ही बातमी वाचली का? इथे नोकरी मिळेल : मेट्रो प्रकल्पामध्ये आहेत रोजगाराच्या संधी, जाणून घ्या डिटेल्स...

कामगारांची गरज म्हणून सुरुवातीला स्थानिक कामगारांना कामावर बोलावले. त्यानंतर इतर भागांतील कामगारांना रुजू करून घेतले; मात्र तरीही आवश्‍यक कुशल कामगारांचा तुटवडा सर्वच उद्योगांना भासत आहे. गावाकडे गेलेले कामगार पुन्हा आणण्यासाठी सर्वच स्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात कामगार पुन्हा येऊ लागले असले तरी त्याचे प्रमाण मर्यादित आहे. कामगारांची कंपनीच्या आवारातच निवासाची व्यवस्था करावी, यांसारख्या अटी कंपन्यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. 

ही बातमी वाचली का? बोलाच भात अन् बोलाचीच कढी; एकीकडे चीनी मालावर बहिष्काराच्या घोषणा आणि दुसरीकडे चीनी मोबाईलवर भारतीयांच्या उड्या...

अडचणींचा डोंगर 
सद्यस्थितीत कंपन्यांना पूर्वीप्रमाणे कामे मिळत नाहीत. व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू, सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. पुरवठादारांचे वेगळेच प्रश्‍न आहेत. सध्या खरेदीसाठी ग्राहकही उत्सुक नाहीत. अशा अनेक अडचणी दिसत असल्याने उद्योगाचा गाडा सुरळीत होण्यास आणखी बराच कालावधी जाणार आहे. 

ही बातमी वाचली का? बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच..

औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा तुटवडा असून, स्थानिक रहिवासी कामासाठी फारसे पुढे येत नाहीत. जिल्हाबंदी कायम असल्याने अडचणीत भरच पडत आहे. पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू होऊ शकलेले नाहीत. कामांची मागणी कमी आहे. सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. त्याचा थेट परिणाम मोठ्या उद्योगांवर होत आहे. 
- के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industrial city Navi Mumbai slows down; Consequences of labor shortage