आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

एमआयडीसी क्षेत्रातील आगीसारख्या दुर्घटनांवेळी धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या काही प्रलंबित मागण्या चार ते सहा महिन्यांत पूर्ण होतील, असे आश्‍वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. मुळात आगी लागूच नयेत, यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 

मुंबई : एमआयडीसी क्षेत्रातील आगीसारख्या दुर्घटनांवेळी धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या काही प्रलंबित मागण्या चार ते सहा महिन्यांत पूर्ण होतील, असे आश्‍वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. मुळात आगी लागूच नयेत, यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 

हेही वाचा - मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

अंधेरी आणि महापे एमआयडीसी क्षेत्रांत गुरुवारी लागलेल्या आगींच्या पार्श्‍वभूमीवर ते ‘सकाळ’शी बोलत होते. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एमआयडीसीचे अग्निशमन दल सज्ज आहे. काही किरकोळ त्रुटी दूर करून हे दल परिपूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण होईल. उद्योगांनी त्यांची जबाबदारी ओळखून सज्ज राहावे; त्यावरही आम्ही भर देत आहोत, असेही देसाई म्हणाले.

महत्वाचं - आजपासून EMI होणार कमी, बातमी वाचा

एमआयडीसी अग्निशमन दलाच्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या संचालक मंडळाने मान्य केल्या आहेत. मनुष्यबळात वाढ व काही साधनसामग्रीच्या मागण्या मान्य झाल्या असून, यंत्रणा सुसज्ज होत आहे. बंबगाड्यांसाठी मागणी नोंदवण्यात आली असून, जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण सुरू आहे.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industry should employ trained personnel to prevent fire accidents