मोबाईल कॉलिंग २५ टक्क्यांनी महागणार ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

मुंबई - तुमच्या मोबाईलच्या बिलांमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची मोबाईल बिलं आता तब्ब्ल २५ टक्क्यांनी वाढू शकतात. सध्या vodafone - idea आणि bharati air tel या टेलिकॉम क्षेत्रातील बड्या कंपन्यांकडून थकीत रक्कम वसुलीचं काम सुरु आहे. कोर्टाच्या आदेशानंतर दूरसंचार विभागाने या कंपन्यांना त्वरित १.४७ लाख कोटी रूपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मोबाईल कॉलिंग तब्ब्ल २५ टाक्यांनी महागणार असं या क्षेत्रातील आभ्यासकांचं म्हणणं आहे.       

मोठी बातमी - आरशातून तो एकटक तिच्याकडे पाहत होता, एक चुकीचा टर्न घेताच तिनं मारली उडी...

दूरसंचार विभागाकडून वोडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल यासह तब्बल १५ कंपन्यांकडून थकीत AGR रक्कम वसुली सुरु आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या कंपन्यांना २४ जानेवारी पर्यंत थकीत रक्कम भरण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी १७ मार्चपर्यंतचा वेळ दूरसंचार कंपन्यांना देण्यात यावा अशी विनंती याचिका कोर्टात दाखल करण्यात आलेली. यावर कोर्टाने संमती जरी दर्शवली असली तरीही यावर अद्याप निकाल येणं बाकी आहे. या आठवड्यात निकाल आला नाही तर मात्र या कंपन्यांना नोटीस देण्यात येईल. यातील अनेक कंपन्या बंद पडल्यात.  

मोठी बातमी -  नव्या आदेशांमुळे वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार ?      

दरम्यान, या क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते एवढी मोठी सक्कम भरण्यासाठी ग्राहकांच्या कॉलिंग चार्जेसमध्ये वाढ केली जाऊ शकते. याआधीच टेलिकॉम सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून अतिरिक्त सुविधा बंद करण्यात आल्यात. Vodafone - Idea ने त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांना मोफत देण्यात येणाऱ्या Netflix, Amazon Prime सारख्या OTT माध्यमांच्या सुविधा बंद केल्यात. पुन्हा दरवाढ झाल्यास डिसेंबर पासून म्हणजेच गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी दरवाढ असेल.

मोठी बातमी -  आजपासून तुमचा EMI होणार कमी, वाचा बातमी

भारतीय मार्केटमध्ये Jio आल्यापासून इतर कंपन्यांना ग्राहक टिकवण्यासाठी मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतोय. १.४७ लाख कोटींपैकी ९२,६४२ कोटी रुपये लायसन्स फी तर ५५,०५४ कोटी रुपये स्पेक्ट्रम चार्जेस आहेत. एअरटेलची थकीत रक्कम ३५ हजार कोटी रुपये तर व्होडाफोन आयडियाची थकीत रक्कम  ५३ हजार कोटी रुपये आहे. दरम्यान रिलायन्स जिओने त्यांची AGR ची ३१ जानेवारी २०२० पर्यंतची रक्कम दूरसंचार विभागाला दिली आहे.
 
mobile calling charges are expected to increase by twenty five percent

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile calling charges are expected to increase by twenty five percent