esakal | मंदिराशेजारी वाहत वाहत आले अर्भक 
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिराशेजारी वाहत वाहत आले अर्भक 

अर्भकाची अवस्था अत्यंत खराब असल्याने हे अर्भक मुलाचे की मुलीचे, ही ओळख पटवणे ही अशक्‍य झाले आहे.

मंदिराशेजारी वाहत वाहत आले अर्भक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर - उल्हासनगर परिसरात जिवंत किंवा मृत अर्भक फेकण्याच्या घटना घडत असतानाच अशी आणखी एक घटना समोर आली आहे. मंगळवारी (ता.3) अंबरनाथ शिवमंदिराच्या भिंतीजवळ एकेकाळी नदी असलेल्या; मात्र आता नाल्यात रूपांतर झालेल्या वालधुनीच्या प्रवाहात एका प्लास्टिक पिशवीत अर्भकाचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक संपूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आहे. 

हेही वाचा - मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात एक ठार 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिवमंदिराजवळील ऐतिहासिक अंबरनाथ फेस्टिव्हलची 1 फेब्रुवारी रोजी सांगता झाली. या फेस्टिव्हलचे गुणगान सर्वत्र सुरू असतानाच आज त्याच जागी या अर्भकाचा मृतदेह सापडला आहे. याबद्दल माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनजीतसिंग बग्गा यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - दोन हात एका पायाने चित्र काढणारा अवलिया

हे अर्भक दोन ते अडीच महिन्यांचे असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने हे अर्भक मुलाचे की मुलीचे, ही ओळख पटवणे अशक्‍य झाल्याने त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी ते उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

web title : The infants came flowing near the temple